परवा पृथ्वीतलावर ‘महाराष्ट्र’देशी ‘मराठी भाषा गौरव दिन’ उर्फ ‘मराठी भाषे’चं ‘वर्षश्राद्ध’ थाटामाटात, समारंभपूर्वक साजरं करण्यात आलं!
‘मराठी भाषा गौरव दिन’ ज्या पद्धतीनं आणि रितीनं साजरा केला जातो, त्यावरून मराठी भाषा मेलीबिली की काय असा प्रश्न पडतो. कारण जिवंतपणी कुणाचंही तोंडावर कौतुक, सन्मान करण्याची महाराष्ट्रदेशाची परंपरा नाही. त्यामुळे मराठी भाषा निदान त्या मार्गावर तरी असावी. त्यामुळेच तिला तिथून मागे खेचण्यासाठी २७ फेब्रुवारी हा दिवस एवढ्या मोठ्या प्रमाणात, जोशाजल्लोषात साजरा केला जात असावा.......